गणतंत्र

34

नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर
मानवतेचा नवा हुंकार.
गणतंत्राच्या महाशक्तीतील
किसान आंदोलनाचा नवा प्रहार…

मनामनात क्रांतीच्या ज्वाला
गणतंत्र वाचवण्यासाठी नवा करार.
हुकूमशाही व्यवस्थेच्या ध्वस्ततेसाठी
टँक्टर परेड नवा आविष्कार…

जखळबंद गणतंत्राला
मुक्त करण्याचा नवा संगार
किसान आंदोलनानी पेटवला
लोकांच्या मनात नवा अंगार…

भारताच्या काळ्या आईसाठी
भूमीपुत्राचा नवा पुकार.
कृषी नव्या कायद्याविरूध्द
भारतीयांचा नवा एल्गार…

भारतीय संविधानाच्या महाऊर्जेचा
कणाकणात भिनला नवा संचार.
प्राणपणाने लढणारा किसानबंधू
गणतंत्र क्रांतीचा नवा शिल्पकार…

✒️लेखक:-संदीप गायकवाड
नागपूर(९६३७३५७४००)