चंद्रपूर (दि.26जानेवारी) रोजी 24 तासात 27 कोरोनामुक्त 17 कोरोना पॉझिटिव्ह – दोन कोरोना बधिताचा मृत्यू

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.26जानेवारी):- जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 17 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीताचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार एक वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 464 झाली आहे.

सध्या 149 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 96 हजार 926 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 71 हजार 46 नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये वणी येथील 73 वर्षीय पुरूष व देवळा येथील 79 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 388 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 350, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 17 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील एक, चंद्रपुर तालुक्यातील तीन, बल्लारपुर चार, भद्रावती दोन, ब्रम्हपुरी दोन, नागभीड एक, वरोरा दोन, जीवती एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.