परळी आगार बसस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या चालू करा -वसंत मुंडे

24

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

बीड(दि.26जानेवारी):- जिल्हातील प्रथम क्रमांकाचे असलेले परळी बसस्थानक आता शेवटच्या क्रमांकावर नाव घेतले जात असुन या बस स्थानकात आगार प्रमुखांनी स्वत: लक्ष देवून बसस्थानक सुधरावे. असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी केले. विविध अडचणीसाठी जबाबदारी नावाची दखल राहिली नाही. यामुळे परळी बसस्थानकास उतरती कळा लागली आहे. 15 वर्षापूवी बस स्थानकास 25 लाख उत्पन मिळत होते. त्यावेळेस औरगांबाद विभागा मध्ये सर्वात उत्कृष्ट उत्पन देणारा म्हणुन परळी बसस्थानक नावाजले जात होते.

परळी आगारात गेल्या काही दिवसात डिझेल मुळे लांब पल्याच्या गाड्या उशीर सुटत होत्या. तसेच लाबपल्यांची परळी-भुसावळ गाडी वाटर लिकेज व इतर अडचणीमुळे बस स्थानकाच्या बाहेर जावून नादुरूस्तीमुळे परत येत आहेत. परळी-नागपुर बस वाहन चालकामुळे 2 तास उशीरा सुठुनही परळी आगार प्रमुखांच्या कर्मचार्‍यावर वचक राहिली नसल्यामुळे परळी आगार मोडकळीत आलेले दिसत आहे.

असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी महाराष्ट्र शासनाकडे तक्रार दिली आहे.चौकट अंबाजोगाई येथील बसस्थानकात लांब पल्ल्याच्या बसेस आल्यानंतर चालक-वाहकाला विश्रांती करण्याकरिता विश्रांतीरूममध्ये कोणतीही सुविधा नसल्यामुळे लांब पल्ल्यावरून येणार्‍या ड्रायव्हर (चालक) यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ खंत व्यक्त केली.