सर्वांग सुंदर संविधान

२६ जानेवारी १९५० ला भारताचे संविधान लागू झाले आणि आम्ही सांसदिय लोकशाहीप्रमाणे आमच्या देशाचा कारभार सुरु केला…!७० वर्षाचा काळ ऊलटुन गेला तरीही आमची राज्यघटना कशी तयार झाली,?राज्यघटना तयार करण्यासाठी कुणी किती कष्ट घेतले?,ज्या महामानवाने माझ्या देशाचं सविधान लिहलं त्या महामानवाप्रति माझे काय कर्तव्य आहे.?माझ्या देशाच्या संविधानाणे मला कुठले आणि किती अधिकार दिले आहेत.?माझ्या देशाच्या संविधानाप्रति माझे काय कर्तव्य आहे.?या आणि अशा प्रश्नांची ऊत्तरे जो पर्यंत आपल्या देशातील प्रत्येक नागरिक अगदी बीनतोड आणि अचुक प्रकारे देऊ शकतं नाही तोपर्यंत आम्ही सच्चे देशप्रेमी,आणि सच्चे संविधानवादी होऊचं शकतं नाही….!

आम्ही ७० वर्षापुर्वी सांसदिय पद्धतीने राज्यकारभार सुरु केला,म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार तरीही आज देशातील पदवीधर माणसाला,सरकारी नोकरदाराला ,इथल्या अधिकारी पदावर काम करणा-या अधिकारी माणसाला भारतीय संविधानाबाबत इथंभुत माहिती नाही, हे वास्तव आहे…!
ही परिस्थिती शिकलेल्या वर्गाची आहे तर अर्धशिक्षित आणि अज्ञानी वर्गाचे काय.?या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण.?
या सर्व प्रकाराला जबाबदार आहेत संवैधानिक मार्गाने सत्तेच्या खुर्चीत बसलेले राजकिय पुढारी आणि प्रस्थापित सत्ताधारी पक्ष त्याच्याही पलिकडे जाऊन स्पष्टपणे सांगायचे म्हणजे कॉंग्रेस आणि भाजप…!

ही वस्तुस्थिती आहे की,७० वर्षे होऊनही इथल्या सत्ताधारी सरकारने कधीही “संविधान ” साक्षरतेसाठी कधीही कार्यक्रम राबविला नाही…!भारतीय अभ्यासक्रमात संविधानाचे अंतरंग ऊलगडणारा विषय अंतर्भुत केला नाही…!त्याचा परिणाम म्हणून आजही अनेक लोकं आपल्या देशाचं संविधान लिहणा-या महामानवाला त्यांच्या अथक परिश्रमाला सुद्धा न्याय देतं नाहीतं…!आमच्या देशाच्या संविधानाने मला कोणते हक्कआणि अधिकार दिले आहेत याची जाणिव नसलेला खुप मोठा वर्ग या देशातं आहे,या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आजही ओबीसी बांधवांना त्यांच्याच हक्का विरुद्ध मनुवादी धर्माचा आधार घेऊन आपसात लढवितं आहेत…!शेतकरी वर्गाला गुलाम करण्याची योजना कार्यान्वित केली गेली आहे….!

अल्पसंख्याक समुहाला भयग्रस्त ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अराजक सदृश परिस्थिती निर्माण केली जातेआहे…!संविधानाची इथंभुत माहिती असलेला समस्त समाज निर्माण झाला असता तर आज संविधान बदलाची भाषा करण्याची कुणाचीही हिंमत्त झाली नसती…!जे संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत ते मुठभर आहेत.परंतु ते संविधान बदलण्याची भाषा का करीत आहेत.? कारण त्यांना चांगली जाणिव आहे की,या देशातील खुप मोठा वर्ग हा संविधाना पासुन अनभिज्ञ आहे,संविधानाने ज्यांना खुप मोठे आणि अनमोल हक्क व अधिकार दिले आहेत तेचं मुर्ख असल्यामुळे त्यांना सहज धर्माचा ,जातीचा दाखला देऊन भडकवीता येते आणि संविधानावर घाला घालता येतो…!आज देशातं तेचं कुटिल कारस्थान मोठ्या प्रमाणावर सुरु आहे…!

प्रत्येक संवैधानिक संस्था मोडित काढुन संविधान संपविण्याचे षढयंत्र रचले आहे.तरीही आम्ही मुक होऊन पाहतं राहिलो तर ऊद्या मनुस्मृती आमच्या बोकांडी बसलेली असेल यात तिळमात्र शंका नाही…!आमच्या संविधानाने ,न्यायपालिकेला स्वायत्तेचा दर्जा दिला आहे,म्हणजे न्यायाधिश हा कोणताही दबाव न मानता कायद्यानुसार आपला न्याय देऊ शकतो ,मग तो कितीही मोठ्या पदावरील अधिकारी व्यक्ती असला तरीही आणि कोणत्याही जातीचा माणूस असला तरीही…!परंतु ७० वर्षातील २०१९ मध्ये पहिली घटना घडली आहे की,सुप्रिम कोर्टातील जज पत्रकार परिषद घेऊन आपलं ग-हाण मिडिया समोर मांडतं आहेत की,आमची स्वायत्ता धोक्यात आली आहे,आमच्यावर दबाव आहे…!

याचा सरळ अर्थ असा आहे की,न्यायपालिकेची स्वायत्ता संपवून इथं कुणीतरी संविधानाची मोडतोड करुन मनमानी कारभार करीत आहे हे संविधानासाठी आणि देशातील लोकशाहीसाठी अतिशय घातकं आहे…!असाचं प्रकार ,संरक्षण संस्था,मिडिया,प्रशासन,आणि निवडणूक आयुक्त या बाबतीत सुद्धा होतं आहे…!हा सगळा प्रयत्न केल्या जातं आहे,संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्यासाठी…!आपले संविधान हे जगातील सर्वांग सुंदर संविधान आहे यावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे…!डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करुन हे संविधान एकट्याने २वर्षे ११महिने १८दिवस खपुन तयार केले आहे…!संविधान तयार करतांना २९८ संविधान सभेतील प्रत्येक खासदाराच्या आक्षेपाला समर्पक ऊत्तरे देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक कलमाचा अन्वयार्थ समजाऊन सांगुन ते कलम पास केले आहे…!

संविधान तयार करतांना २५०० आक्षेप नोंदवल्या गेले,त्या सर्व आक्षेपांचे निराकरणं करुनचं संविधानाचा मसुदा तयार झाला…!संविधान तयार होईपर्यंत आपल्या संविधानाचे संविधान सभेत तीन वेळा पुर्ण वाचन करण्यात आले आणि प्रत्येक सभासदाचं समाधान झाल्यावरचं संविधानाला मंजुरी देण्यात आली…!डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करण्या अगोदर १५० घटनांचे मसुद्यांचा अभ्यास केला होता…म्हणून आपले संविधान सर्वांग सुंदर बनले आहे…!आजच्या दिवशी आम्हा सर्व भारतीय जनतेची जबाबदारी बनते की,आपले सर्वांग सुंदर संविधान मुठभर मनुवाद्यांच्या मगरमिठीतुन वाचविले पाहिजे….!
जयभीम.

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर
( राजकीय विश्लेषक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार विचारवंत जेष्ठ मार्गदर्शक अकोला जिल्हा)
मो- 9960241375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
( केज तालुका प्रतिनिधी)
मो- 8080942185

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED