नापिकीमुळे दावणगीर येथील तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

23

✒️देगलूर,तालुका प्रतिनिधी(महादेव शरणप्पा उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.26जानेवारी):- तालुक्यातील दावणगीर येथील तरुण शेतकरी खुशाल उर्फ पिंटु मारोती देवकत्ते रा.दावणगीर वयः३० वर्षे असे असून सततच्या नापिकी व कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि.25/1/2021 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

प्राप्त माहिती नुसार दावनगीर येथील मयत शेतकरी खुशाल मारोती देवकत्ते वयः30 वर्षे हा शेती करीत असून,गेल्या काही वर्षापासून सतत ओल्या व कोरड्या दुष्काळामुळे होणाऱ्या नापिकीला तो कंटाळून व बँकेचे कर्ज कसे फेडावे या विचाराला कंटाळून या विचारात तो दि.25/1/2021 रोजी सकाळी शेतात पाणी देण्यासाठी घराबाहेर पडला व शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला.

मयताचे वडील मारोती देवकत्ते हे जनावरे घेऊन शेताकडे गेले असता ,हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी मरखेल पोलीसात आकस्मिक म्रत्यूची नोंद करण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नागनाथ सुर्यतळे हे करीत आहेत.