जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिव्यांगाचे बेमुदत धरणे आंदोलन

37

🔹जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटनेचा या आंदोलनात जाहिर पाठिंबा

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.26जानेवारी):-दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी नांदेड समोर दिव्यांग व्यक्तीने 24 जानेवारी पासुन बेमुदत धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र शासन व दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे यांनी सतत दिव्यांग प्रिय योजनेची जिआर व दिव्यांग कायदे आणि नव नविन दिव्यांग अॅप काढुन व तसेच विविध दिव्यांग योजनेची घोषणाबाजी नेहमीतपणे करत आहे. पण या दिव्यांग योजनेची नांदेड जिल्हात कसल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नसल्याने व तसेच दिव्यांग व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नसल्याने दिव्यांगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याकरीता दि.24 जानेवारी पासुन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांग व्यक्तीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनात दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे कुंचोलीकर आणि बेरोजगार कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे व तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे दिव्यांग अध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे व विठ्ठलराव देशमुख यांनी विराट ढोल बजाव आंदोलन करुन प्रसाशानाचे लक्ष वेधले होते. व तसेच या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सर्व विविध दिव्यांग संघटना व दिव्यांग बांधव एकत्र येऊन जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर यांना विविध दिव्यांग मागण्यांचे निवेदन देण्यात आले. व तसेच जिल्हाधिकारी साहेब यांनी पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा महसूल प्रसाशानाला बोलवुन लवकरच एक बैठक बोलवण्यात येईल. व तसेच दिव्यांगांचे एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरील बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील महसुल प्रशासनाला दिव्यांग संघटना नी चांगलेच धारेवर धरले होते.

🔺आंदोलनातील दिव्यांगाच्या प्रमुख मागण्या

दिव्यांग मित्र अॅप नांदेड प्रणालीची काटेकोरपणे जिल्हात अंमलबजावणी करावी. डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या कृत्रिम अवयव मोजमाप शिबीरातील गरजु दिव्यांग व्यक्तीला पायाभूत साधने व साहित्य तात्काळ द्यावी. नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय राशनाचा नविन ईष्टांक वाढ करुन सर्व दिव्यांगाला अंत्योदय राशन कार्ड व राशन उपलब्ध करून द्यावे. शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात स्वयं रोजगारासाठी दिव्यांगाला 200 स्वेअर फुट जागा उपलब्ध करून द्यावी. म.ग्रा.रो.ह.योजने अर्तगत दिव्यांग व्यक्तीला त्यांच्या गावातच किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन द्यावा. दिव्यांगाला प्रथम प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ द्यावा. दिव्यांगाला व्यवसाय करीता बिज भांडवल योजना मध्ये बॅंक कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. ग्रा.पं, न.पं., न.पा. म.न.पा.,पं.स., जिल्हा परिषद आणि स्थानिक मतदार संघातील आमदार, खासदार राखिव असलेला 5% दिव्यांग निधी दिव्यांगावर तात्काळ खर्च करावा.

स्थानिक स्वराज संस्था मध्ये दिव्यांगाला स्वियकृत सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात यावी. सर्व शासकीय योजना व तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या समित्यांवर दिव्यांग व्यक्तीची सदस्य म्हणुन नियुक्ती करावी. ईतर विविध सर्व दिव्यांगाच्या मागण्या करीता दि 24 जानेवारी रोजी पासुनच जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तीने मा.जिल्हाधिकारी कार्यालया समोर न्याय व हक्क द्या नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळे पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनात दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे कुंचोलीकर, बेरोजगार कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे दिव्यांग संघटनचे अध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे व विठ्ठलराव देशमुख,अनिल कदम,जमीर पटेल, अजिंक्य चव्हाण, राहुल सोनुले,फारुख कुरैशी, सुनिल व्यव्हारे,अहेमद भाई, रवी शिरफुले, धुरपत सुर्यवंशी, फहीमोद्दीन सरवरी, रमेश गोडबोले,शब्बीर बेग, बंडू पाटे, शेख इम्रान, महेश चव्हाण, बाबा आली, प्रियंका राठोड, मारोती लांडगे, सलमा शेख, कबिर राठोड,शंकर कदम, दिपक सुर्यवंशी, शेख साजित,आकाश सोनुले,शेख नसिरुद्दीन यावेळी आंदोलनात हजारोंच्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते….