संगणक परिचालकांकडून बिलोलीत शासन निर्णयाची होळी

33

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.26जानेवारी):- येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आज दि. 25 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने शासन निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये गेल्या दहा वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालयातील दस्तावेज आॕनलाईन करणे यांसह विविध शासकिय योजनेचे काम करत आहेत, त्यांना शासकिय सेवेत सामावून घेऊन किमान वेतन देण्यात यावे यासाठी त्यांनी अनेकवेळा मोर्चे अंदोलने निवेदनाद्वारे मागणी केली होती, परंतु शासनाने १४ जानेवारी २०२१ रोजी शासन निर्णय काढून संगणक परिचालकांची मुख्य मागणी बाजूला ठेवून केवळ एक हजार रूपये मानधन वाढवून त्यांच्या तोंडाला पाणे पुसली आहेत.

सदर शासन निर्णयाच्या निषेधार्थ व मुख्य मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना शाखा बिलोलीच्या वतिने २५ जानेवारी २०२१ रोजी बिलोली पंचायत समिती कार्यालयासामोर सदर शासन निर्णयाचा होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला, यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव पाटील, सचिव मारोती हंडे, कार्याध्यक्ष राहूल प्रचंड यांच्यासह तालुक्यातील संगणक परिचालक उपस्थित होते.