म्हसवडकर सेवा संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.27जानेवारी):-26 जानेवारी या दिवशी म्हसवडकर सेवा संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करणेत आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सद्धम्म संडे स्कूल चे शिक्षक आयु. विनोद कसबे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेऊन, विभागातील ज्येष्ठ उपासिका आयु. लीलाबाई सरतापे आणि हिराबाई बनसोडे यांच्या हातून विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाचे पूजन करून त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करन्यात आले. म्हसवडकर सेवा संघातर्फे दिनांक 24/1/ 2021 रोजी घेण्यात आलेल्या चित्रकला आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा याच्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले गेले.

मोठया गतामधील विजेते कुणाल पगारे, कृष्णा पटवा, जान्हवी आयरे लहान गटातील सांबारास शिवदास,आलिया अस्लम शेख,प्राची वैश्य तसेच सुदंर हस्ताक्षर स्पर्धामध्ये मराठीमध्ये चेतना वाघमारे, इंग्लिशमध्ये पूजा मोहिते या स्पर्धकांना मोठी बक्षिसे, आणि सर्व स्पर्धकांनाही छोटी बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर सर्वाना सामोसा-लाडु वाटप केले. काही स्पर्धकांनी सुंदर भाषण केले.यावेळी प्रमुख पाहुणे विनोद कसबे यांनी उपस्थितांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघांचे सचिव -मंगेश भाई सरतापे, संचालक -वीरेंद्र सरतापे, सदस्य -जितेंद्र सरतापे, प्रदीप बनसोडे, शैलेंद्र सरतापे, सतीश सरतापे, मुकुल सरतापे, आवेश सरतापे, अरुण(पिंट्या ) बनसोडे, यांनी खुप मेहनत घेतली. विभागातील सर्व नागरिक आणि मुलांनी चांगले सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे अध्यक्ष युवराज सरतापे यांनी आभार मानले. सर्वांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन करून यापूढे आपल्या संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे त्यासाठी वेळोवेळी आपल्या सहकार्याची गरज राहील आपले धन्यवाद.