माण तालुका बहुजन समाज पक्षाकडून विविध मागण्यांचे माण तहसीलदार यांना दिले निवेदन

32
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.27जानेवारी):-समाज पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देणेत आले या मागण्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक कायदे त्वरित मागे घ्यावेत,एस.सी.,एस.टी., ओ.बी.सी.व इतर प्रवर्गातील विध्यार्थ्याच्या प्रलंबित स्कॉलरशिप त्वरित देणेत यावी तसेच केंद्र व राज्य सरकारनी एस.सी.,एस.टी. आणि ओ.बी.सी.इ.प्रवर्गाच्या उन्नतीसाठी प्रस्तावित निधीमध्ये वाढ करावी व होणाऱ्या जनगणनेमध्ये ओ.बी.सी.ची जातीनिहाय जनगणना व्हावी,माण तालुक्यातील गंजलेले,वाकलेले विजेचे खांब त्वरित बदलावे,प्रजासत्ताक दिनी संविधान (preamble)उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन देणेत आले.

मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल असा इशारा पार्टीच्या वतीने देणेत आला.यावेळी पक्षाचे सातारा जिल्हा प्रभारी श्री.नारायण कालेलं सर,सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री.महेश सराटे, माण-खटाव मतदार संघ प्रभारी श्री.वसंत बनसोडे आणि प्रभारी श्री.शिवाजी सावंत उपस्थित होते.