संस्था चालकांसह मतीमंद व अनाथ विद्यार्थ्यांच्या उपोषणाला विविध संघटनांचा पाठींबा

31

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.27जानेवारी):- चंद्रपूर जिल्हयातील नागभिड येथील स्वामी विवेकानंद मतीमंद मुलांची निवासी शाळा असुन या शाळेमध्ये मतीमंद मुले मागील दिड दशकापासून शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या संस्था चालकाला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान शासनाने मंजूर न केल्यामुळे मतीमंद व संस्थाचालक यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. या गंभिर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता 25 जानेवारी पासून संस्थाचालकासह मतीमंद विद्यार्थी उपोषनाला बसलेले आहेत. उपोषनाचा तिसरा दिवस असून देखील प्रशासनाने कुढल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे उपोषण आनखी तिव्र करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष मंगल पेटकर व संस्थेचे सचिव पुरूषोत्तमजी चैधरी यांनी दिला आहे.

दरम्यान सदर उपोषणाला जिल्हयातील विविध संघटनेनी पाठींबा दर्शविला आहे. त्या संघटनेमध्ये श्री. गुरूदेव सेवा मंडळ, तुलसी नगर, चंद्रपूर, महाराष्ट्र ग्रामीन पत्रकार संघ, चंद्रपूर, चंद्रपूरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, असोसिएशन आॅफ स्माॅल अॅन्ड मिडीयम न्युज पेपर आफ इंडिया शाखा चंद्रपूर, डिजिटल पोर्टल असोसिएशन चंद्रपूर,दिलीप रामेडवार मनसे. जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसचे विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी यांनी पाठींबा दर्शविला आहे.सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर जिल्हयासह संपुर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन मोठया आनंदाने साजरा झाला परंतु चंद्रपूर जिल्हयातील नागभिड येथील स्वामी विवेकानंद निवासी शाळेतील विद्यार्थी मात्र यापासून वंचीत राहिले. त्यामुळे त्यांना व संस्थध्यक्षांना उपोषनाचा मार्ग पत्करावा लागला.

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हयाचे पालकमंत्री मा. विजयभाऊ वडेट्टीवार शासकीय ध्वजारोहण करून उपोषन मंडपासमोरून पुढील कार्यक्रमासाठी गेले परंतु उपोषन मंडपाला साधी भेट सुध्दा न देता व मतीमंदाच्या व्यथा जानुन घेण्याची तसदी सुध्दा घेतली नाही. यावरून असे स्पष्ट होते की, त्यांना अनाथ मुलांचे काही सोयरसुतक नाही असे वाटते.
लोककल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्थे व्दारा 40 विद्याथ्र्यांची मान्यता असलेल्या स्वामी विवेकानंद मतीमंद मुलांची शाळा नागभिड येथे सन 2011 मध्ये शासकीय अपंग मुलाचे बालगृह तुकुम चंद्रपूर येथील अनाथ मतीमंद मुले महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय अनुदानीत, विषश शाळेत सदर मुलांना दाखल न केल्यामुळे स्वामी विवेकानंद मतीमंद मुलांची शाळा नागभिड येथील संस्था प्रमुख व सचिव श्री. पुरूषोत्तम चैधरी यांनी सामाजीक जबाबदारी म्हणून आपल्या विषेश शाळेत विद्याथ्र्यांना दाखल केले. त्यावेळेस ही मुले 18 वर्षाखालील होती तर काही मुले शिक्षण घेवुन आत्मनिर्भर झालेली आहेत. 2 मूले 18 वर्षाखालील तर 5 मुले 18 वर्षावरील आहेत.

संस्थेनी शाळा अनुदानीत नसल्यामुळे व बालकल्याण समितीकडून आदेशित ही विषेश मुले आमच्या विषेश शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे दरवर्षी विषेश बाब म्हणून 100 टक्के अनुदान तत्वाववर शासनाने मान्यदा द्यावी करीता पत्रव्यवहास सुरू होता. परंतु निष्ठुर सरकारने सदर अतीसंवेदनशिल प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. विषेश बाब म्हणून विद्यमान महाराष्ट्रचे मुख्यमंत्री साहेब यांनी त्वरीत लक्ष घालून आम्हास न्याय द्यावा किंवा विषेश बाब म्हणून मतीमंद मुलांचे स्थानंातर दुसऱ्या शाळेत करावे किंवा नियमाप्रमाणे संस्थेस अनुदान द्यावे अशी मागणी संस्थचालकाची शासनाकडे करीत आहे. दरम्यान यापुर्वी असे कितीतरी शासन निर्णय मान्य झालेले आहेत. शासनाकडून कोणत्याही आर्थीक मदत मिळत नसल्यामुळे व या संस्थेच्या अंतर्गत प्रश्न असलेल्या स्वामी विवेकानंद बालगृह, नागभिड या संस्थेचे महिला व बालकल्याण विभागाच्या मुल्य निर्धारन अंतीमीकरणानुसार संस्थेला प्रलंबीत असलेले अनुदान न मिळाल्यामुळे उच्च न्यायालय मुंबई (खंडपिठ) नागपूर यांच्या निर्णयानुसार तरी प्रलंबीत अनुदान मिळेल ही अपेक्षा सुध्दा आता धुसर होत चाललेली आहे.

दरम्यान संस्थाचालकावर वाढलेल्या कर्जामुळे संस्था शेवटच्या घटका मोजत आहे. या गंभिर बाबींची दखल शासनाने लवकरात लवकर न घेतल्यास चालु असलेले आमरण उपोषण हे अधीक तीव्र करण्यात येईल व या गंभिर प्रकरणाची जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहील. असा ईशारा संस्थेचे पदाधिकारी यांनी दिलेला आहे.