‘नारीशक्ती सेवा फाउंडेशन’ चे उद्घाटन

27

🔹जीवनात एकात्मता, स्वच्छता व शिक्षण महत्त्वाचे- पालकमंत्री ना. कडू

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.28जानेवारी):- संत गाडगेबाबांनी शिक्षणाचा नारा दिला शिक्षणाच्या गुणात्मक बाबीवर त्यांनी प्रकाश पाडला आणि त्याचा प्रत्यक्ष अंमल हा भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून केला. राष्ट्रीय एकात्मता, संघटना, स्वच्छता व शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले, आपल्या जीवनात याबाबींचे पालन आवर्जून केलेच पाहिजे, असे प्रतिपादन, राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथिल श्री . शिवाजी महाविद्यालयातील नारी सेवा फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी केले.

याप्रसंगी ना.कडू यांच्या हस्ते ‘नारीशक्ती सेवा फाउंडेशन’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लोककवी डॉ.विठ्ठल वाघ, प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, डॉ.संजय खडक्कार, प्रबंधक अशोक चंदन, आयक्युएसीचे प्रमुख डॉ.आशिष राऊत, डॉ जी.व्ही.कोरपे, प्रा.संजय काळे, प्रा. दत्तकुमार भरसाकळे, एकनाथ उपाध्ये, राजाभाऊ देशमुख, शौकत अली शौकत तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवर्ग व विभागप्रमुख व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी आपल्या शैलीमध्ये उपस्थितांना कविता ऐकवून मंत्रमुग्ध केले. प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा प्रवास सांगितला. फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुम्मिया सुमैया अली यांनी फाउंडेशन बद्दल सविस्तर माहिती दिली.ना. कडू यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ.आनंदा भिकुजी काळे व डॉ. अर्चना पेठे यांना प्रदान करण्यात आला.त्यानंतर महाविद्यालयाचे उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या सिनिअर अंडर ऑफिसर आनंद भगत,साक्षी नवलकर, श्रीमती मळसने, शरद गावंडे,वंदना पेठे, श्रीकांत देशमुख, उत्कृष्ट वक्ता विद्यार्थी योगेश राऊत, विद्यार्थिनी यत्री देशमुख, सर्वोत्कृष्ट खेळाडू गौतम रामटेके, अचल वासनिक, ऋषिकेश इंगळे, आकांशा गोमासे, सचिन अरुण काळे,आनंदा भगत, साक्षी नवलकार, सुजित किरण खंडारे , शिवानी राजेंद्र काळे, वंशिका दिनेश पाडिया व कल्याणी विखे या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पालकांसह सत्कार करण्यात आला. एनसीसी प्रमुख व समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.आनंदा काळे यांनी गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन केले.