प्रजासत्ताकदिना दिवशी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ*

🔸तीर्थपुरी SBI बँक अधिकाऱ्याचा नाकर्तेपणा

🔹घनासावंगी तालुक्यातील मंगरूळ खरात येथील शेतकऱ्यांना ठेवले पिककर्जापासून वंचित

🔸मंगरूळ येथील शेतकऱ्यांचे पिककर्ज मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.28जानेवारी):- जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकरी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाचा अवलंब करीत आमरण उपोषणास बसले आहेत.पिककर्जा पासुन तीर्थपुरी येथील भारतीय स्टेट बँक च्या अधिकाऱ्याने जाणून बुजून नाकर्तेपणा करून मंगरुळ येथील शेतकऱ्यांवर प्रजासत्ताक दिना दिवशीच उपोषण करण्याची वेळ आणली आहे.

उपोषणकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी, जालना यांना उददेशून लिहीलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे की, दिनांक २०जून २०१९ रोजी सर्व कागदपत्रसह पिक कर्ज मागणी अर्ज भारतीय स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा तिर्थपुरी येथे देऊन तसेच वारंवार पाठपुरावा करुनही बँकेकडून पीक कर्ज मिळाले नसल्याचे नमूद केले तसेच बँकेच्या व्यवस्थापकाने मनमानी करत व जाणूनबुजून कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

पीक कर्ज न मिळाल्या मुळे शेतकऱ्यांवर भारतच्या प्रजासत्ताक दिनीच उपोषण करण्याची वेळ आली आहे.सदरील तक्रारीच्या अनुषंगाने पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार कर्जवाटप करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी जालना यांना करण्यात आली आहे . जाणूनबुजून कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापनावर योग्य ती करवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले.

यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रामप्रसाद माणिकराव खरात,बालासाहेब भागवतराव खरात, ज्ञानेश्वर मुंजाळ, सुग्रीव राखंडे,बाबुराव बेवले, महादेव मोटे, गिरिजाबाई शरणांगत,हनुमंतराव खरात, आप्पासाहेब निर्मळ, अनिल काकासाहेब खरात यांच्या अनेक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय जालना समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED