विकेल ते पिकेल अभियानांतर्गत तीन विक्री केंद्राचे उद्घाटन

30

🔹गोंडसावरी, पिंपळखुट व नंदगुरचा समावेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.28जानेवारी):-विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडसावरी, पिंपळखुट व नंदगुर येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी उभारलेल्या विक्री केंद्राचे उद्घाटन नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, यांचे हस्ते काल संपन्न झाले.

याप्रसंगी कृषी उपसंचालक तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, उषा तरोणे, रविंद्र कन्नाके, आतिस आत्राम, भाविक आत्राम, गाडगे व गटातील इतर शेतकरी उपस्थित होते.