कुंडलवाडीत 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले

    39

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

    बिलोली(दि.28जानेवारी):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील सर्पमित्र विजयकुमार गुप्ता मित्र मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या प्रांगणात आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला.श्री हुजूर साहेब ब्लँड बँक रक्तपेढी नांदेड यांना सदरील रक्त देण्यात आले.येथील सर्पमित्र विजयकुमार गुप्ता मित्रमंडळ यांच्या वतीने दि.26 जानेवारी 2021 रोजी रक्तदान शिबिर आयोजीत करून सामाजीक बांधिलकी जोपासली.सामाजीक उपक्रम प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

    यावेळी रक्तदान केलेले रक्त श्री हुजूर साहेब ब्लँड बँक रक्तपेढी नांदेड यांना देण्यात आले रक्तदात्यांत कल्याण गायकवाड,साईनाथ देवरवार,साईनाथ पोरडवार,मुकेशकुमार जोशी,राहुल सब्बनवार,विनोद कलेवार,राजेश माहेवार,सौरभ गुंडाळे,आशुतोष टाक,शिवकुमार गंगोने,रामनाथ करपे,मोहन चाबकसवार,नागनाथ खैराते,देविदास सलगरे,साईनाथ ब्यागलवार,मोहन दमकोंडावार,गोविंद मागावार,चंद्रशेखर भोरे,शाम ब्यागलवार,संजय गुंडावार,देवन्ना पाशावार,शिवराम मुकावार,दिगांबर कदम,साई भोकरे,राजेश पुपलवार,गंगाधर हमद,साईनाथ शेखरकोट,नागेश जायेवार,योगेश माद्रेवार,संजय मोकावार आदींनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री हुजूर साहेब ब्लँड बँक रक्तपेढीचे कर्मचारी प्रदीप कुमार कांबळे पीआरओ,गोल पाटील टेक्नीशियन,सचिन थोरात टेक्निशियन,विशाल वायवळे टेक्निशियन,बालाजी आमबीलगे,तर सर्पमित्र विजयकुमार गुप्ता मित्र मंडळाच्या वतीने विजयकुमार गुप्ता,सयाराम मुकेरवार,लखन नागुलवार,कपिल हुंडेकर,साईनाथ माहेवार,साई भोकरे,करण समेटवार,दत्ता हमद आदींनी परीश्रम घेतले.