युवा स्वाभिमानी पार्टी च्या यवतमाळ जिल्हा संघटक अध्यक्ष पदी पवन चव्हाण (पाटील)

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.28जानेवारी):- युवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हा संघटक अध्यक्षपदी पवन चव्हाण पाटील यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.युवा स्वाभिमानी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा, मार्गदर्शिका खासदार नवनीत राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत पवन चव्हाण पाटील यांना पार्टीचा हिताच्या दृष्टीने समाजाच्या उन्नतीसाठी तसेच पार्टीचे ध्येयधोरण, प्रतिमा, समाजात उंचावत ठेवण्याच्या दृष्टीने जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

अमरावती येथे युवा स्वाभिमानी पार्टी चा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात युवा स्वाभिमानी पार्टी चे पधादिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय तसेच सामाजिक कामामध्ये नियमित अग्रेसर राहणारे पुसद येतील सामाजिक कार्यकर्ता पवन चव्हाण पाटील यांची कार्याची दखल घेत विनोद गुहे ,पवन गुहे, आकाश काशीकर व बाळू इंगोले यांच्या मार्गदर्शनात अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आमदार रवी भाऊ राणा, खासदार सौ नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळ जिल्हा संघटक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

पवन चव्हाण पाटिल यांच्या कड़ें आता सामाजिकच नव्हे तर पक्षाचे दाईत्व सुद्धा देण्यात आले आहे. युवा स्वाभिमानी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा, मार्गदर्शिका खासदार नवनीत राणा यांनी माझे वर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी मी स्वेच्छेने निष्ठापूर्वक पक्षाचे ध्येयधोरण बांधील राहून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही चव्हाण पाटील यांनी सांगितले.पवन चव्हाण पाटील यांच्या निवडीचे यवतमाळ जिल्हामधे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.