वडूज येथे अशोक बैले लिखित “कोरोना”पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

30
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9975686100

म्हसवड(दि.28 जानेवारी):-शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते श्री.अशोक बैले यांनी आपल्या लेखणीतून “कोरोना” या पुस्तकाचे लिखाण केले.आज गेली सहा महिने संपूर्ण जिल्ह्यात फिरून कोरोना महामारीच्या काळात आपले कर्तव्य बजावत असताना ज्या कोरोना योध्याचा बळी गेला अशा कोरोना योध्याचा सन्मान करणे या उद्देशाने श्री.अशोक बैले यांनी या पुस्तकाचे लिखाण केले.

यासाठी त्यांनी भरपूर माहिती गोळा केली आणि प्रत्येक कोरोना योध्याच्या घरी भेटी देऊन माहिती घेऊन यात त्यांचा कार्याचा गौरव सन्मान केला आहे.या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिद्धिविनायक मंदिर ,सभामंडप,वडूज येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी कोरोना योध्याच्या कुटूंबातील व्यक्तींना पुस्तक भेट देऊन त्याचा सन्मान करणेत आला.यावेळी पुस्तकाचे सर्वानी कौतुक केले आणि लेखक बैले यांना यासाठी शुभेच्छा दिल्या .पुस्तक प्रकाशनाच्या आधीच या पुस्तकाची नोंदणी विक्री मोठ्या प्रमाणात झाली.यावेळी अशोक बैले यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थित सर्वाचे आभार मानले.