प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा त्वरित लाभ द्यावा – प्रहार सेवक चिमूर यांची मागणी

28

🔹तालुका कृषी अधिकारी यांच्या निवेदन

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.28जानेवारी):-शेतकरी राजा कोरोनाच्या काळात शेतकरी राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुद्धा बळीराजाचा घात करतोय. चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगाची गळती होत असून कापूस पिकाला लागलेली गुलाबी बोंड किंवा धान पिकाला लागलेला कंरपा रोग असो ,हरबारा पिकांची फुल गळती ,या सर्व पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

चिमूर येथील प्रहार सेवक यांना शेतकरी राजावर संकट येताच शेताची पाहणी करून चिमूर येथील तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत दादाजी भुसे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र शासन मुंबई याना , त्वरित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे.

त्या संधर्भात आज चिमूर येथील प्रहार सेवक विनोद उमरे, प्रहार सेवक सत्यपाल गजभे , प्रहार सेवक संकेत नवले प्रहार सेवक सुमित खडारे प्रहार सेवक स्वप्नील खोब्रागडे प्रहार सेवक नारायण निखाडे, प्रहार सेवक सचिन घानोडे , प्रहार सेवकआदित्य कडू, प्रहार सेवक मुरलीधर रामटेके, प्रहार सेवक नारायणन मत्ते, प्रहार सेवक संदीप निखाडे , यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्वरित लाभ द्यावा यासाठी पीक विमा तात्काळ देण्याची मागणी केली