विकासक विमल शहा समोर ये, दलालांना पुढे करू नकोस- डॉ. राजन माकणीकर यांचे जाहीर आव्हान

31

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.29जानेवारी):- विकासक विमल शहा समोर ये महादलाल व भडवेगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढे करून स्वतःची पोळी भाजून घेऊ नकोस. अन्यथा वंचित झोपडी धारकांसह तुझ्या घराचा ताबा घेऊ. अशी चेतावणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिली आहे.

वेळ आली आहे तुझी व तुझ्या महादलाल तथा मस्तवाल अधिकाऱ्यांना नागडे करण्याची, झोपडीपासून वंचित राहिलेल्यांना सदनिका कश्या मिळत नाहीत हे पाहून घेऊ, कायद्यासमोर तुझ्यासखे छप्पन आडवे झालेत. तू काय चीज आहेस, तुला कायद्याचा व खऱ्या आंबेडकरी वाद्यांचा बडगा दाखवतो. अश्या शब्दात डॉ राजन माकणीकर यांनी एम.आय.डी.सी प्रकल्पात चोरी झाल्याचे सांगून अश्या चोरास नागडे करणार असल्याचे संकल्प व्यक्त केला आहे.

शासनाचा प्रकल्पात भडवेगिरी करून महाभ्रष्टाचार करणारे विकासक व एमआयडीसी अधिकारी दोघांची खैर नाही, वीस वर्षांपूर्वी पात्र केलेल्यांना पुन्हा दस्ताऐवजांच्या आधारावर अपात्र करून सदनिका गळपाटण्याचा विकासाकाचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही धडक मोर्चा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेकडोंना विनालॉटरी सदनिकेत घुसवनार्यांना लवकरच त्यांची जागा दाखवून खरा सूत्रधार शोधण्यासाठी शेकडोंचा हा मोर्चा प्रकल्पाचा कायापालट करेल हे निश्चित.

प्रकल्पात सुरुवातीपासून काम करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या वंशावळी संपत्तीची चौकशी लावून वीस वर्षपूर्वी कार्ट्रेज विकणारा परप्रांतीय धनदांडगा कसा झाला शासनाच्या प्रकल्पात कशी चोरी केली हे उघड करावयाचे आहे.

मोर्चातुन प्रश्न सुटून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई नाही झाल्यास, पात्र वंचित झोपडीधारकास सदनिका नाही मिळाल्यास, भाडे धनादेश नाही दिल्या आत्मदहनाचा इशाराही डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे दिला आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बंजारा सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाई शिवा राठोड आयोजित मोर्चा आंदोलनाचे अध्यक्ष कॅप्टन श्रावण गायकवाड असून नेतृत्व डॉ. राजन माकणीकर करत आहेत, या मोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारली असली तरी शेकडोंच्या संख्येने आंदोलन होणार आहे.

पोलिसांच्या माध्यमातून विकासक व महादलाल आंदोलनाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र लोकशाही संविधानिक मार्गाने आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला असून आंदोलन होणारच असा ठाम विश्वास डॉ माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.

आंबेडकरवादी हमारे जेब मे है! म्हणणाऱ्या मनूच्या पिलावळीच्या कानाखाली चपराक देण्यासाठी सज्ज असून अफवांचे पेव फुटले आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन ही डॉ. माकणीकर यांनी केले आहे.