सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.29जानेवारी):- कृषी विभागाचे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी वरोरा व भद्रावती यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम 28 जानेवारी रोजी संताजी मंदिर सभागृह, शेगांव (बु), ता. वरोरा येथे संपन्न झाला.

सदर प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, गरज व संधी, उपलब्ध बाजारपेठ, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण, सेंद्रिय शेती करिता लागणाऱ्या निविष्ठा बाबत मार्गदर्शन व प्रत्यक्ष निविष्ठा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव कथन, व शेती उपयोगी औजारे बाबत पाहणी व माहिती शेतकरी प्रशिक्षणाचे माध्यमातून देण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उपसंचालक तथा प्रकल्प उपसंचालक (आत्मा) आर. जे. मनोहरे यांनी केले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी एम. ए. जाधव, शेतकरी सल्लागार समिती चे सुरेश गरमडे, शेतीतज्ञ हेमंतजी चव्हाण, विरेंद्र बरबटे, एम.एस. वरभे, व्हि. पी. काळे, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर सेंद्रिय शेती शेतकरी रवींद्र जिवतोडे, सुनील उमरे यांनी आपले शेतीतील अनुभव व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन व्हि. डी. घागी, यांनी केले तर उपस्थितांचे आभार एस. सी. हिवसे यांनी मानले.कार्यक्रमाला विनोद राऊत, धनराज असेकर, शंकर भरडे, अशोक बदकी, तसेच कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व्ही. के. शेंडे, पी. के. देशमुख, एम एस आसेकर, सेंद्रिय शेती गटातील शेतकरी उपस्थित होते.