धानोली) चंद्रपूररात चिकन मेळाव्याचे आयोजन

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

भद्रावती(दि.30जानेवारी):-गोंडवाना इंटरप्राजेस धानोली व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या सयुक विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील धानोली येथे कौस्तुभ पोल्ट्री फार्म धानोली मध्ये चिकन मेळावाचे आयोजन करण्यात आले. या जनजागृतीपर कार्यक्रमात डॉ. राजा दुधबळे अध्यक्ष विदर्भ पोल्ट्री अशोशियन ,प्रा.डॉ. मुकुंद कदम,डॉ. सुरेन्द्र राऊत,डॉ. युसूफ शेख,डॉ. मत्ते, प्रविण ठेंगणे सभापती पचायत समिती भद्रावती.अर्चना जिवतोडे सभापती जि.प.चंद्रपूर.बैक आँफ इडियाचे व्यवस्थापाक झा साहेब.डॉ नंदकिशोर मैंदळकर यांच्यासह अनेक मान्यवर व विविध पोल्ट्रीधारक यावेळी उपस्थित होते.

डॉ राजा दुधबळे म्हणाले की, चिकन व अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. शिवाय, ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. शरीराला प्रथिनांची गरज असते. संसर्गाशी लढण्याशी ताकद अंडी व चिकनमधून मिळते.

त्यामुळे अंडी या आहाराचा पोषण आहार योजनेत देखील शासनाने समावेश केला आहे. या उत्कृष्ट व प्रथिनयुक्त अन्नाबाबत विनाकारण कुणीही गैरसमज पसरवू नयेत. अफवांमुळे पोल्ट्रीधारक बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.
बर्ड फ्लूबाबत गैरसमज पसरून पोल्ट्रीधारकांचे नुकसान होते. व्यवसाय व रोजगाराची हानी होते. कोरोनाकाळात तर नियमित चिकन अंडी खाऊन प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. दणकट आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज न बाळगता तंदुरूस्तीसाठी नियमित अंडी व चिकन खाण्याचे आवाहन विविध पोल्ट्रीधारकांनी केले आहे तर डॉ युसूफ शेख चंद्रपूर जिल्हात बर्ड फ्लू चा ससंर्ग नसुन त्या तंदुरुस्त आहे.

व कुक्कुटपालन व्यवसायीकांनी त्याचे लसीकरण केलेले असते.सध्यातरी आपल्या परिसरात कुठलाही आजाराचा धोका नसुन चिकन खाणे हे नागरिकांनी सुरळीत चालू ठेवावे. जेणेकरून या व्यवसायावर अवलंबुन असलेले.

कित्येकांचे संस्कार सुरळीत चालू राहतील आणी त्याच्यावर उपासमारीची पाळी. येवू नये.तसेच लोकांच्या मनातील बर्ड फ्ल्यू बद्दलची भिती निघून जावी या करिता चिकन.मेळाव्याचे. आयोजन करण्यात आले होते ल.या कार्यक्रमाचे डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी सूत्रसंचालन केले.तर.आभार डॉ अनंता अकोलखेडकरकेले यानिमित्त आयोजित स्नेहभोजनात अंडी व चिकनच्या प्रथिनयुक्त चवदार पदार्थांचा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आस्वाद घेऊन हे अन्न पूर्णतः सुरक्षित असल्याचा दाखला दिला. यावेळी तरुण सहाणी,शामराव गडे,राहुल विधाते आदी उपस्थित होते.