हिंगणघाट तालुक्यातील मोहता मिलच्या एका बड्या अधिकाऱ्याने ४० लाख रुपये किंमतिचे सुटे भाग लांबविले- मिळाली न्यायालयीन कोठडी

32

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.30जानेवारी):-तालुक्यातील बुरकोनी
येथील मोहता इंडस्ट्रीज लिमिटेड या कापड निर्मिती करणाऱ्या उद्योगातून कंपनीचे एका बड्या अधिकाऱ्याने तेथील कर्मचाऱ्याचे सहकार्याने ४० लाख रुपये किंमतिचे सुटे भाग लांबविल्याचे प्रकरणी आज दि.३० रोजी पोलिसांनी संशयित दोन्ही आरोपींना १० दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली असून त्यांचा जमानत अर्ज फेटाळला.या प्रकरणी संशयित आरोपी बालेंद्र प्रतापसिंग आणि गजानन उरकुड़े यांचा सुरवातीस ३ व नंतर १ दिवसांचा पीसीआर घेऊनही पोलिसांचे तपासात काहीच ठोस माहिती हाती न आल्याने आता पोलिस यंत्रणासुद्धा संशयाचे भोवऱ्यात सापडली आहे.

दिवसाढवळ्या झालेल्या या सुनियोजित चोरीचे तार कारखाना परिसरातच जुळले असून पोलिस मात्र गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची चर्चा मोहता उद्योगसमुहात होत आहे.
सदर प्रकरणी व्यवस्थापक बोलेंद्र प्रताप सिंग तसेच विजतंत्री गजानन उरकुड़े यांनीच सदर चोरी केल्याचे प्रथमदर्शनी उघड़किस आल्याने सदर प्रकरणातील चोरी गेलेले मशिनीचे सुमारे ४० लाख,१९ हजार रुपये किंमतीचे सूटे भाग हस्तगत करण्यासाठी ३ दिवसांचा पीसीआर घेण्यात आला होता. परंतु हिंगणघाट पोलिस तपास पुर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने पोलिसांनी पुन्हा दि.२९ रोजी आरोपींचा पीसीआर एक दिवसाकरिता वाढवून घेतला होता. आज मात्र न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना १० दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे.

लॉकडॉऊन कालावधीपासून बंद स्थितीत असलेल्या कारखान्याचे परिसरातील ४६ मशीनचे एकूण ४० लाख १९ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स कार्ड तसेच मदर बोर्ड या जोड़गोळीने लांबविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते.बाजारभावाप्रमाणे सदर सूटे भाग १ करोड रुपये किंमतीचे असून पोलिसांची तपास प्रक्रिया मंदावलेली दिसुन येत आहे. आता पुढील तपास करतांना हिंगणघाट पोलिस हतबल झाल्याचे दिसुन येत असल्याने सदर तपास वरिष्ठ पातळीवरुन करण्याची गरज आहे.