न.प.गटनेते वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा भेट

23

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.30जानेवारी):-न.पचे गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेवाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा (सोलार हायमास्ट) भेट देण्यात आला. सामाजिक जाणिवेतून वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या या सौरदिवा (सोलार हायमास्ट) मुळे आश्रम व परिसर उजळून निघाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगर परिषद गटनेते वाल्मीक कराड यांच्या वाढदिवासनिमित्त माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने “गुरुदास सेवा आश्रम” घाटनांदुर येथे “सौर दिवा” बसविण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवता आणि सर्वधर्म समभाव या विचारांच्या मूल्यावर “गुरुदास सेवा आश्रम” चालतो.या आश्रमास अनेक मूलभूत गरजा अत्यावश्यक असून यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड चे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे स्वतः लक्ष देवून असतात. सातत्याने जिथे अडचन येईल तिथे मदतीचा हात देत असतात.आपण देखील नैमेत्तीक सहकार्य जरुर ही भावना ठेवून गटनेते वाल्मीक कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सौर पथदिवा या आश्रमात समाधी स्थळाजवळ बासविण्यात आला.यामुळे आश्रमात आता वीज खंडित झाली तरी सौरदिव्याच्या माध्यमातून प्रकाश मिळणार आहे.यावेळी आश्रमातील वृद्धांना फराळाचे वाटप करण्यात आले. यापुर्वीही स्व.पंडितअण्णा मुंडे व स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ आश्रमाला वीजेवर चालणारे हायमास्ट बसविण्यात आलेले आहेत.

यावेळी बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, नगरसेवक अनिल आष्टेकर, महादेव रोडे,जयराज देशमुख युवानेते अनंत इंगळे, लालाभाई पठाण,धोंडीराम धोत्रे,जितेंद्र नव्हाडे, शशिकांत बिराजदार, श्रीपाद पाठक,अनिल घेवारे,बड़े सर यांच्यासह आश्रमामधील लालजी महाराज,चंदू महाराज आदि मान्यवर उपस्थित होते.गुरुदास आश्रमातील सर्व वृद्ध सेवाधारी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी वाल्मीक कराड यांच्या आयुआरोग्य आणि जनकल्याणहेतु राष्ट्रवंदना गाण्यात आली व वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यात आले.