बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींना प्राधान्य व अग्रक्रम देणार पोलीस अधिक्षक आर.राजा यांचे आश्वासन – राजेंद्र लाड

28

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.31जानेवारी):-बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष तथा पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिक्षक आर.राजा यांची पोलीस अधिक्षक कार्यालय बीड येथे दि.२९ जानेवारी २०२१ रोजी शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा बीड च्या वतीने भेट घेण्यात आली.यावेळी प्रथमतः पोलीस शौर्य पदक मिळाल्याबद्दल दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी बोलतांना त्यांनी संघटनेस आश्वासन दिले की,बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींना प्राधान्य व अग्रक्रम देवून त्या नियमान्वये व कायद्यान्वये सोडविण्यासाठी प्रयत्न करुन दिव्यांग संघटनेस दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत सर्वतोपरी मदत करील.अशी माहिती दिव्यांग हितार्थ शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.

तसेच यावेळी पोलीस अधिक्षक आर.राजा पुढे असेही म्हणाले की,दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील प्रकरण २ मधील हक्क व अधिकार तसेच प्रकरण क्रमांक १६ गुन्हे व शिक्षा विषयक तरतुदींची अंमलबजावणी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व पोलीस चौक्यांमधील संबंधित यंत्रणेकडील तक्रारी उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार दाखल करुन घेण्यात येतील.

यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या अधिनिस्त येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन मधील संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देवून आदेशित करण्यात येईल. तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय बीड येथील कार्यालयात भेटण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांना भेटण्यासाठी प्राधान्य देण्यात येवून त्यांच्या तक्रारींचे व समस्यांचे निराकरण करण्यात येईल.असेही शेवटी पोलीस अधिक्षक आर.राजा यांनी संघटनेस आश्वासन दिले.या आश्वासनाचे स्वागत संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी केले आहे.