यवतमाळ येथे दोन दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

28

🔸भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा व तालुका शाखा आणि संरक्षण विभाग यवतमाळ यांचा पुढाकार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.31जानेवारी):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ तसेच तालुका यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुभेदार रामजी सकपाळ (आंबेडकर) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बोधिसत्व बुद्ध विहार पिंपळगाव रोड यवतमाळ येथे १ फेब्रुवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष रवीजी भगत हे उपस्थित राहणार आहेत .तर उद्घघाटक म्हणून ज्ञानेश्वर अभ्यंकर उपाध्यक्ष यवतमाळ बटालियन हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून के .एम हेलोंडे लेफ्टनंट जनरल बुलढाणा बटालियन तसेच आर.ओ. सावंत मेजर बुलढाणा बटालियन हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भगवान इंगळे अध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ (पूर्व) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राहुल राऊत कोषाध्यक्ष जिल्हा यवतमाळ, ॲड .गोविंद बनसोड उपाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ, ललित बोरकर उपाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ, रंजना ताकसांडे उपाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ, मोहन भवरे तालुकाध्यक्ष यवतमाळ हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे संचालन रुपेश वानखेडे हे करणार आहेत.या प्रशिक्षण शिबिराकरिता नाव नोंदणी करण्याची जबाबदारी गौतम कुंभारे, सिद्धार्थ बन्सोड,किशोर उके यांच्याकडे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत या वेळेत करण्याची देण्यात आली आहे.

समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचा समारोप २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ५ पर्यंत संपन्न होईल .या शिबिराच्या सांगता समारोपप्रसंगी जिल्हा शाखेचे तसेच तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी व सैनिक यांनी समता सैनिक दलाच्या युनिफॉर्मवरच सकाळी ९ वाजता पासून उपस्थित राहावे तसेच कार्यक्रमाचे उद्घघाटन ११ वाजता होईल.या कार्यक्रमाकरिता जिल्हा शाखा , तालुका शाखा व संरक्षण विभाग तसेच समस्त भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे जिल्हाध्यक्ष रवीजी भगत यांनी केले आवाहन केले आहे.