तपोभुमी गोदेंडा येथे ६१ व्या गुंफा महोत्सवानीमीत्य व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शनी व मार्गदर्शन

🔸नागरीकांनी व्यसनमुक्त जीवन जगावे – जीतेंद्र गाडगे

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.31जानेवारी):-तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभुमी गोदेंडा येथे ६१ व्या गुंफा महोत्सव नीमीत्य जीवनदर्शन बहुद्देशीय संस्था , चंद्रपुर व्दारा संचालीत श्री.गुरूदेव व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र , नेरी ( चिमुर ) तर्फे व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शनी व मार्गदर्शन गुरूदेव भक्तांना व भावीकांना केले .

कोरोनाची महामारी संपुर्ण जगात चालु असुन यावर उपाय म्हणुन सामाजीक अंतर ठेवणे आवश्यक आहे . त्यामुळे गोदेंडा तपोभुमी येथे ६१ व्या गुंफा महोत्सव २८ जानेवारीला ,समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी श्री.गुरूदेव व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र , नेरी तर्फे संस्थेचे प्रकल्प समन्वयक जीतेंद्र गाडगे यांनी पोस्टर प्रदर्शनी व सर्व गुरूदेव भक्तांना व भावीकांना , नागरीकांना कोरोनाचे नीयम पाळुन व सोशल डीस्टंस ठेवुन मार्गदर्शनातुन सांगीतले की, गुरूदेवाचे वीचार आत्मसात करा. रोज पहाटे सकाळी उठुन फीरायला जा व व्यायाम करा, महाराजांनी सांगीतलेच आहे की , व्यसनमुक्त जीवन जगल्याने मानवाच्या बुध्दीचा वीकास होत असतो .आजचा युवक व नागरीक व्यसनाधीन झाला आहे.

या दारूच्या व्यसनाने नागरीकांच्या आरोग्यावर व मानसीकतेवर परीणाम पडत असतो .त्यामुळे आपल्याला मार्गदर्शनाची व उपचाराची गरज आहे .हे संस्थेचे प्रकल्प समन्वयक जीतेंद्रगाडगे मार्गदर्शनातुन महत्वाचे मुद्दे मांडले.पोस्टर प्रदर्शनी व मार्गदर्शनाच्या वेळेस चंद्रभान शेन्डे , सचीव श्री.गुरूदेव गुंफा समीती गोदेंडा , संभाजी वाढई चंद्रपुर , सुबोध घोनमोडे , क्रीष्णा वसाके , सौ.मीराबाई ढोक , दामोधर दडमल गोदेंडा , भोजराज कामडी , हे उपस्थीत होते

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED