डायरच्या औलादींने भगतसिंग, उधमसिंग जन्माला घालू नका

26

✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

परवा दिल्लीत पोलिसांनी शेतक-यांच्यावर लाठीचार्ज केला. अश्रूधुराची नळकांडी फोडली. आंदोलन मोडून काढता येत नसल्याने तसेच शेतकरी मागे हटत नसल्याने लाखो तिरंगी झेंडे घेवून दिल्लीत रँली काढणा-या शेतक-यांच्या बदनामीचे सत्र जोरात सुरू आहे. मोदी आणि त्यांची पिलावळ पुर्ण ताकदीनिशी हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी कामाला लागली आहे. परवा रात्री पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि भाजपाचे काही आमदार आंदोलनस्थळी शेकडो लोक घेवून गेले होते. शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकारने जंग जंग पछाडले आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना याबाबत बोलताना हुंदका आवरता आला नाही. त्यांच्याच देशात त्यांचीच अशी अवहेलना त्यांना सहन झाली नाही, ते ओक्साबोक्सी रडले.

परवा दिल्लीत भाजपाने आपलेच लोक घुसवत शेतकरी आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न केला आहे. ते षढयंत्र भाजपाचेच होते. पैसे घेवून मोदींच्याकडे मेंदू गहाण टाकलेली आणि विकलेली माध्यमं या बदनामीच्या कामात व्यस्त आहेत. ज्यांनी गेले साठ दिवस शेतकरी आंदोलनाचे कव्हरेज केले नाही ते नालायक शेतक-यांना गुंड वगैरे बोलत आहेत. हे खुपच खेदजनक आहे. परवाच्या दिल्लीतील घटणेनं जालियनवाला बागेची आठवण झाली. स्वातंत्र्याच्या चळवळीत जालियनवाला बागेत सभेसाठी गोळा झालेल्या हजारो लोकांच्यावर जनरल डायरने अंधाधूंदपणे गोळ्या झाडल्या होत्या. यात तब्बल चारशे लोकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते पण त्याच हुतात्म्यांच्या रक्तातून भगतसिंग आणि उधमसिंग हे दोन महान क्रांतिकारकही जन्माला आले. तिथून पुढे अवघा पंजाब पेटून उठला होता. पंजाबात स्वातंत्र्याची चळवळ फोफावली.

परवाच्या दिल्लीतील घटणेनं जालियनवाला बागेची आठवण झाली. दिल्लीच्या सत्तेत असलेल्या औरंगजेबी आणि डायरच्या औलादींना अजून हा देश ओळखता आलेला नाही. ते शेतक-यांचा आवाज दाबू पहात आहेत, चिरडू पहात आहेत. सरकार जर अशी कारस्थानं करून डायरच्या औलादीसारखे वागत असेल तर पंजाबच्या क्रांतीभूमीतून हजारो भगतसिंग आणि उधमसिंग जन्माला येतील. लालाजी लजपतराय यांच्या छाताडावर मारलेल्या लाठीचा हिशोब भगतसिंगानी चुकता केला होता. त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी सँडर्सला गाठून यमसदनास पाठवले होते तर जालियनवाला हत्याकांडाचा बदला उधमसिंगने लंडनमध्ये जावून घेतला होता. तिथे त्यांनी ओडवायर संपवला होता. देशाच्या स्वांतंत्र्य चळवळीत आणि जडणघडणीत शिख बांधवांचे मोठे योगदान आहे. हा देश स्वतंत्र करताना पंजाबच्या भूमीने रक्ताचे पाट वाहिले आहेत.

त्या भूमीतल्या भूमिपुत्रांना देशद्रोही म्हणायची हिम्मत संघवाली बांडगुळं करतातच कशी ? ज्यांच्या बापजाद्यांनी या देशाशी गद्दारी केली, ज्यांच्या बापजाद्यांनी इंग्रजांना मदत केली, ज्यांच्या बापजाद्यांनी इंग्रजांचे तळवे चाटले ते देशासाठी रक्त सांडणा-यांना देशभक्ती शिकवणार का ? सरकारवाले अशीच बदनामी करत सुटले, जनतेचा असाच आवाज दाबत सुटले, दडपशाही करत सुटले तर पंजाबच्या भूमीतून हजारो भंगतसिंग आणि उधमसिंग जन्माला येतील. मस्तवाल सत्तेची मस्ती कशी उतरवायची ? ते पंजाबच्या पुत्रांना चांगलेच ठाऊक आहे. त्यांनी जगावर राज्य करणा-या इंग्रजांची मस्ती उतरवली आहे मग मोदी-शहा नावाचे हे टिकोजीराव कोण लागून गेले ?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आगीत हात घालू नये. क्रांतीचा वारसा असलेल्या आगीशी खेळू नये. पंजाबच्या भूमीत जागोजागी क्रांतीकारंकांचे रक्त सांडलेले आहे. क्रांतिकारंकांच्या मातीला आणि वारसदारांना देशद्रोही ठरवण्याची, त्यांचा आवाज दडपण्याची नमकहरामी करू नये. सरकारने या कारस्थानांना आवर घालावा. मिडीया आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून आंदोलकांना खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तमाम भाजपेयी आणि संघी पिलावळ असले विष ओकण्याचे काम करत आहेत. या पिलावळींचे तिरंग्याबाबत भलतेच प्रेम उतू चालले आहे. तिरंग्याचा अपमान झाला म्हणून हे सर्व बोंबा ठोकत आहेत. या देशात संघी पिलावळींनी जेवढा तिरंग्याचा अपमान केलाय तेवढा आजतागायत दुस-या कुणी केलेला नाही. संघ परिवाराने १९४७ पासून २००२ पर्यंत तिरंग्याला राष्ट्रध्वज मानला नाही. तिरंगा राष्ट्रध्वज कधीच संघ शाखेवर फडकावला नाही. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाल्यावर त्यांनी नागपुरच्या संघशाखेवर २००२ साली तिरंगा फडकावला. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंच्चावन्न वर्षे ज्यांनी तिरंग्याला राष्ट्रध्वजच मानले नाही, तो सन्मानाने फडकावला नाही त्यांना तिरंग्याबाबत बोलण्याचा काय अधिकार ?

संघी बेट्यांनो, ही षढयंत्रे तुम्हाला खुुप महागात पडतील. स्वत:च्या बेलगाम सत्ताकांक्षेला व अहंकाराला लगाम घाला, जमिनीवर या. तुमची कारस्थानं अशीच बेदरकारपणे सुरू राहिली तर येणा-या काळात लोक तुमच्या मस्तवाल सत्तेला उलथवून टाकतील. आज सत्ता तुमच्या हातात आहे याचा अर्थ असा नव्हे की ती चिरकाळ राहिल. येणा-या काही वर्षात लोक रस्त्यावर ओढून मारतील. जे आज अंधपणे मोदींच्यावर प्रेम करतायत तेच तुडवतील. ज्या दिवशी त्यांच्या डोळ्यावरची भक्तीची पट्टी हटेल, त्यांना वास्तवाचा आणि सत्याचा साक्षात्कार घडेल त्या दिवशी हेच घडेल.