जगदगुरु तुकोबांच्या अस्थिंचासुद्धा शोषकांनी घेतला भयंकर धसका

  52

  या विश्वामध्ये एकमेव संत ज्यांचा जन्म तर भुतलावर झाला परंतु त्यांना संपविल्यानंतरही त्यांच्या अस्थि किंवा राख मात्र या भुतलावर कुठे असल्याचा पुरावाच पुसून टाकल्या गेला एवढा धसका त्यांच्या घातपाती मृत्यूनंतर या शोषकांनी त्यांच्या अस्थिच्या राखेचा घेतला होता. कारण अभंगरुपी घणाघाती वार शोषकांना सोसनं असह्य झाल्यामुळे या अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवून नष्ट करुनही त्या जशाच्या तशा शोषित भारतीयांच्या मुखात राहू शकल्या एवढी ताकद या अभंगरुपी वारात होती, शोषकांवर वार करणारे तुकोबांचे लाखो वारकरी आजही तयार होवून या शोषकांवर वार करत आहे.

  जर का तुकोबांच्या अस्थि या अमुक ठिकाणी आहे एवढे जरी आम्हा वारकऱ्यांना माहित असते तर त्या समाधीला नतमस्तक होवून आम्हा वारकऱ्यांमध्ये या शोषकांविरोधात विरश्री संचारली असती व या शोषकांची ही शोषीतव्यवस्था उधळून लावली असती एवढी ताकद त्यांच्या या अस्थित होती याची जाणीव या शोषकांना नक्की होती त्यामुळे त्यांच्या समाधीपर्यंत कोणी पोहचूच नये याची व्यवस्था त्यांनी “पुष्पक विमान वैकुंठ” हे भ्रामक शस्त्र आम्हा वारकऱ्यांवर चालवून आम्हाला पराभूत केले. याची प्रचीती देहूला गेले असता प्रत्येक वारकऱ्याला झाल्याशिवाय राहत नाही.

  प्रत्येक भावीक संत महापुरुषांच्या समाधीस्थळाला नतमस्तक व्हायसाठी अधीर झालेला असतो.कितीतरी त्रास सहन करत तिथपर्यंत जावून त्या समाधीवर डोक टेकवून धन्य होत असतो परंतु आम्ही वारकरी देहु ला गेलो असता तुकोबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी मन व्याकुळ होवून भिरभिर फिरते पण माझ्या तुकोबाच्या अस्थि समाधीरुपानं कुठेच दिसत नाही या अतीव दुःखानं खिन्न मनाने तुकाबांचे वास्तव्य असलेल्या घराचं व त्यांचा घातपात ज्या इंद्रायणीने बधितला तिच्या घाटाचं दर्शन घेवून परतावे लागते.आज देहुला तुकोबांच्या वाराला बोथड करुन ट्रस्टी व्यापाऱ्यांनी वैकुंठधाम, गाथा मंदिर सारखे मंदिरं उभे करुन त्यासभोवताल भक्तनिवास असे सोज्वळ नाव देवून होटलचा व्यवसाय सुरु केलेला पाहून मनोमन दुःख होते.

  व्यापारी गाथा मंदिरामध्ये संपूर्ण अभंगगाथा भिंतिवर लिहिल्या असे बोलले जाते परंतु बारीक निरिक्षण केले असता जे अभंग शोषकांवर घणाघाती वार करणारे आहे ते हेतूपुरस्सर टाळलेले असल्याचे दिसून येते.देहुवरुन माघारी फिरतांना मनोमन एकच विचार येतो की माझ्या तुकोबाच्या अस्ती या मातीत आहे एवढं जरी आम्हा वारकऱ्यांना माहित असतं तर इथून परतणारा प्रत्येक भावीक स्फुरण घेवून हा शोषकांचा डोलारा उध्वस्त करणारा सच्च्या वारकऱ्याच्या रुपान तुकोबाचा सैनिक होवून शोषकांना परास्त करुन त्यांचा डोलारा उध्वस्त केला असता यात यत्किंचितही शंका नव्हती. परंतु आम्हा वारकऱ्यांना पुष्पक विमानाने तुकोबांचे वैकुंठ गमन झाल्याच्या भ्रामक कल्पनात गुंतवून वारकऱ्यांचा वार बोथड केल्या गेला. हे शातीर शोषक त्यांच्या कपटकारस्थानात यशस्वी झाले याची आम्हा वारकऱ्यांना यत्किंचितही जाणीव होवू दिली नाही.

  जगदगुरु तुकोबांचा जन्मदिनच स्मृतीदिन म्हणून आम्हाला मानावा लागतो कारण तुकोबांचा घातपाती मृत्यू आम्हाला समजूच दिला नाही.या महान विभूतीला त्यांच्या या जन्मदिनी शतशः प्रणाम.

  ✒️संवेदक तथा शब्दांकन:-रामचंद्र सालेकर(राज्यउपाध्यक्ष
  शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र)मो:-९५२७१३९८७६
  ————–