आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा तर्फे गौरी नेऊलकर हिचा सत्कार

34

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.1फेब्रुवारी):-आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे शिक्षण घेणारी वडाळा (पैकु) येथील रहिवासी कु. गौरी तुळशीराम नेऊलकर हिने एम. एस. सी. भौतिकशास्त्र विषयात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून चौथा क्रमांक व महाविद्यालयातून प्रथम आल्यामुळे २६ जानेवारीला महाविद्यालयात आनंद निकेतन महाविद्यालय वरोराचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. गौरी तुळशीराम नेऊलकर हिने यश प्राप्त केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.