प्रहार संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनाची बस आगार प्रमुख यांनी घेतली दखल

28

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.1फेब्रुवारी):- चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्यात यावी यासाठी प्रहार सेवक विनोद उमरे बस आगार प्रमुख यांना देण्यात आले होते निवेदन त्या निवेदनाची दखल घेत १० फेबुवारी २०२१ पासुन चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्यात येणार आहे,सावरी परिसरातील ४०ते५० विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी बोथली येते दररोज ये जा करीत असतात.

सावरी ते बोथली हे ५ किलोमीटरचे विद्यार्थी प्रवास सायकलने करतात तरी विद्यार्थी प्रवास करताना जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या परिसरात वन्यप्राणी वावर जास्त प्रमाणात दिसून येते या परिसरात वाघ, अस्वल डुकर या परिसरात नेहेमी धुमाकूळ असतो.

तरी विद्यार्थ्यांसाठी चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्यात येणार आहे बस आगार प्रमुख यांनी निवेदनाची घेतली दखल उपस्थित प्रहार सेवक विनोद उमरे, प्रहार सेवक, स्वप्नील खोब्रागडे, प्रहार सेवक लोकेश मंगरे, सचिन घानोडे, नारायणन निखाडे, मुरलीधर रामटेके, संदीप निखाडे ,नारायणन मत्ते या सर्व प्रहार सेवक यांच्या प्रयत्नाला आले यश..