पांदन रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

41

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.1फेब्रुवारी):-जिल्ह्यात पांदन रस्यांकरची कामे मागील वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात आहे. सामान्य नागरिकांना पांदन रस्याारअभावी त्रास होऊ नये, तसेच मजुरांना मागणीप्रमाणे कामे मिळावी म्हणून नियोजनपुर्वक पांदन रस्यां्यच्या व मनरेगाच्या कामात वाढ करून ती कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.पालकमंत्री पांदन रस्ते योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) मंगेश आरेवार, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, दीपक मल्होत्रा, विभागीय वन अधिकारी एस.व्ही.जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.
मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत संत्रा लागवडीसाठी चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठ यांचेशी बोलणे करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सध्या 56 हजार 760 ग्रामपंचायतीची व 4 हजार 258 यंत्रणेची कामे मंजूर असून आज रोजी 1292 कामे ग्रामपंचायतीची आणि 93 कामे यंत्रणांची सूरू आहेत. सध्या एकूण 1 लाख 48 हजार 626 जॉबकार्ड धारक कार्यरत आहेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालु आर्थिक वर्षात आतापर्यंत मासिक मनुष्य दिन निर्मितीची टक्केवारी 98.28 टक्के असल्याची माहिती रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली.यावेळी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.