वाघनख शाळेत जगतगुरु संत तुकाराम महाराज जयंती साजरी

27

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.2फेब्रुवारी):-जि.प.उ.प्राथ शाळा वाघनख येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी प्रतीमेचे पुजन करुन संत तुकाराम महाराज हे शिवकालीन होवून गेलेले महान संत होय,तेच खरे शिवरायांचे गुरु असून स्वराज्य स्थापनेसाठी तुकाराम महाराजांच्या प्रेरणादायी शिकवणूकीचा यात फार मोठा वाटा होता. त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शोषितांना शोषकांच्या जबड्यातून सोडविण्याचा प्रयत्न केला. शोषकांद्वारा तुकाराम महाराजांना फार त्रास व छळ सहन करावा लागला एवढेच नव्हे तर समाज जागृतीच्या या कार्यासाठी आपले बलीदान सुद्धा द्यावे लागले.

तुकाराम महाराजांचा एक एक अभंग जीवन प्रकाशमान करणारं महान तत्त्वज्ञान आहे. आपल्या जीवनाचं सोन करायचं असेल तर प्रत्येकांनी तुकाराम महाराजांच्या गाथांच पारायण करुन ते तत्त्वज्ञान जीवनात उतरवलं पाहीजे असे मार्गदर्शन केले,याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय शिक्षक धनराज रेवतकर यांनी केले.संचालन कु.वैशाली गायकवाड मॕडम यांनी तर आभार सौ.रेखा थुटे मॕडम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी संतोष धोटे स.शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
————-