एस. सी.,ओबीसी. यांच्या हक्कावर गदा आणणारे आरक्षण रद्द करा- माजी सभापती बाळासाहेब रणपिसे

21
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी मसवड-मान)मो:-9075686100

म्हसवड(दि.3फेब्रुवारी):-माण तालुक्यात झालेल्या सरपंच आरक्षण सोडती या एस. सी. ओबीसी यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार्‍या आहेत हे आरक्षण तातडीने रद्द करावे असे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे यांनी व्यक्त केले.
अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या तालुक्यातील बारापैकी पाच ग्रामपंचायतीमध्ये एस.सी. समाजाचा उमेदवारच नसल्यामुळे त्याठिकाणी एस. सी. समाजाचा उमेदवार निवडून येणार नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उमेदवार कसा दिला? ज्या ठिकाणी एस. सी. समाजाची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत एस.सी. समाजासाठी आरक्षण का टाकले नाही? ज्या गावात ज्या कॅटेगिरी ची आरक्षण सोडत काढायची आहे त्या गावातील त्या सदस्याची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाला, जिल्हा निवडणूक अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार इ. सर्वांना माहीत असताना एस.सी. समाजाच्या विरोधात असा खेळ का खेळला जातो ही आरक्षण सोडत सदोष आहे.

एस. सी. समाजावर अन्याय करणारी आहे. त्यामुळे ती त्वरित रद्द झाली पाहिजे रद्द नाही झाली तर तालुक्यातील मागासवर्गीय संघटना या विरोधात तीव्र आणि उग्र अशा स्वरूपाचे आंदोलन करील असे पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे यांनी पत्रकात सांगितले.यावेळी वंचित बहुजन आघाडी,दलीत पँथर ,आर पी आय व समविचारी संघटना यांचेवतीने ,अनुसूचीत जातीच्या चुकीच्या आरक्षणाविरोधात तहसीलदार मान यांना निवेदन देणेत आले.
चुकीचे आरक्षण रद्द करा,फेर आरक्षण जाहीर करा,दोषींवर कारवाई करा ,अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चात तालुक्यातील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.