नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

    49

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    चंद्रपूर(दि.3फेब्रुवारी):^केंद्रीय महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरूस्कारासाठी पात्र इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रीत करण्यात येत आहेत.

    नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुकांनी केंद्र शासनाच्या वेबसाईटवर नमुद मार्गदर्शिकेनुसार आवश्यक पात्रता, नामांकन सादर करणेबाबत माहिती, आवश्यक कागदपत्रे, नामांकन सादर करण्याची पध्दत, वयाची अट, अनुभव याचे वाचन करुन www.narishaktipuraskarwcdgovin/ किंवा www.wcd.nic.in या वेबसाईटवर केवळ ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.