सामान्य माणसांची बांधिलकी ठेवून उपक्रम राबविण्यात येतील

25

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.3फेब्रुवारी):-कोरोना आपत्तीमुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर होत असून विविध विभागातील सर्व स्तरावर त्याचा परिणाम झाला आहे. आर्थिक व सामाजिक बदल दिसून येत असून या काळात अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या, त्यासाठी जनतेचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे.

जिल्हा नियोजनाचे काम करताना सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

आजच्या जिल्हा स्तरीय नियोजन समितीच्या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिवकन्या शिरसाट, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षिरसागर, आ. नमिता मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आदींची उपस्थिती होती.