उद्योग सारथी आकृती हब टाऊन विकासक अधिकारी व महादलालावर अट्रोसिटी दाखल करा – आर.पी.आय डेमोक्रॅटिक

  36

  ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  मुंबई(दि.4फेब्रुवारी):; एस आर ये प्रकल्पात जाणीवपूर्वक सदनिकेपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित सर्व अधिकारी विकासक व महादलाल मुरजी पटेल वर अट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाने केली आहे.

  पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्यातील मुंबई अंधेरी येथील एम.आय.डी.सी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांच्याशी भेटून चर्चा करून अट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याचे निवेदन दिले.

  एस.सी, एस.टी प्रवर्गातील जनतेला त्याचे हक्क हिरावून घेऊन त्यांना रस्त्यावर टाकणे, त्यांची राहण्याचा निवारा हिरकावून घेणे, मालकी जमीन बळकावणे, त्यांची फसवणूक करणे, मुकभुत संविधानिक हक्कापासून वंचित ठेवणे, आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास देणे, त्यांना अपमानित करणे, त्यांची अवहेलना करणे त्यांचा शिक्षणाचा निवासाचा अधिकार काढून घेणे या सर्व बाबी अट्रोसिटी कायद्यांतरंगत गुन्हे असून संबंधित शासकीय अधिकारी विकासक व त्याचे अधिकारी आणि मास्टरमाईड महादलाल याचे वर अट्रोसिटी कायद्यांवन्य अटक करून कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  उद्योग सारथी सक्षम अधिकारी करंडे, उपअभियंता अंबुरे व सह अभियंता निकाळजे यांच्याशी ही भेटून चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या चर्चेत विकासकाचा प्रतिनिधी उपस्तिथ नव्हता, मात्र लवकरच विकासाकाची भेट घडवून आणाने, २२.५% पोटी व मोकळ्या भूखंडापोटी जागा महामंडळास परत मिळणे, पात्र झोपडीधारकांचे थकीत भाडे देय करणे, पात्र झोपडी धारकांचे पुनरावलोकन थांबवणे, योजनेअंतर्गत पात्र झोपडी खरेदी केलेल्याण कायम सदनिका देणे, घुसखोरांना बाहेर काढून मास्टरमाइण्ड शोधून विकासकावर गुन्हा नोंद करणे, लॉटरी सोडत तारीख ठरवणे, झोपदीधारकांची पात्रता ठरवण्याकरिता विकासाकाने कागदपत्र गोळा करून महामंडळास पात्रता प्रमाणित करण्यासाठी सादर करणे व विकासकांच्या विक्री करावयाच्या इमारतीचे बांधकाम रोखणेबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.

  निवेदक पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे उपाध्यक्ष व प्रवक्ते वसंत कांबळे, युवा सचिव विजय चव्हाण, प्रदेशद्याक्ष हरिभाऊ कांबळे व अन्य शिष्टमंडळात उपस्तिथ होते.