महाराष्ट्रातील विधानभवनाच्या अनुसुचित जाती कल्याण समितीच्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागातील सर्व योजनांचे सादरीकरण

24

🔸आ. प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.4फेब्रुवारी):- दिनांक 03 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील विधानभवनातील 7 मजला, कक्ष क्र. 711, येथे महाराष्ट्र शासनाची अनुसुचित जाती कल्याण समितीची बैठक समिती प्रमुख तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांसमवेत संपन्न झाली.या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागातील सर्व योजनांचे सादरीकरण व योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

यावेळेस आ. यशवंत माने, लहू कनाडे, आ. सुनिल कांबळे, आ. नावदेव ससाणे, आ. अरुण लाड, आ. राजेश राठोड, आ. विजय भाई गिरकर, आ. बलराम पाटील, डॉ. किरण लहामटे आदि. विधानसभा व विधानपरिषद सदस्य व श्री. शाम तागडे सचिव सामाजिक न्याय, श्री. नारनवरे आयुक्त सामाजिक न्याय, श्री. दिनेश डिंगळे सहसचिव सामाजिक न्याय, श्री. दिनेश डोके अतिरिक्त आयुक्त, सामाजिक न्याय, श्री. रंगनाथ खैरे अवर सचिव विधानभवन, श्री. पवन म्हात्रे कक्ष अधिकारी व मंत्रालयीन अधिकारी व आयुक्त कार्यालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.