“राहुल साळवे यांना द रिअल पॅंन्थर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर”

24

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.4फेब्रुवारी):- आॅल इंडिया ब्लु टायगर या सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात येणारा द रिअल पॅंन्थर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार बेरोजगार दिव्यांगांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राहुल सिताराम साळवे उंचेगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार दि 9 फेब्रुवारी 2021 रोजी प्रज्ञा प्रदिप बुद्ध विहार पाथरी जिल्हा परभणी येथे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते राहुल साळवे यांना देण्यात येणार आहे.