रिक्त राहिलेल्या ट्रेडच्या आय.टी. आय . प्रवेशाची समुपदेशन फेरी

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.4फेब्रुवारी):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील यापुर्वी झालेल्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या १६५ जागा संस्थास्तरीय पुनश्चः समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येत आहे. त्यानुसार वेळापत्रक जाहिर झालेले आहे . करीता इच्छूक उमेदवारांनी संकेत स्थळावर प्रवेशासाठी अर्ज करणे, दुरूस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे दि.३ ते ७ फेब्रुवारी या दरम्यान समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागाचा अभ्यास करून उमेदवारांनी प्रवेशासाठी आपल्या लाॕगइनवरून समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करावी. दि ८ फेब्रुवारीला ह्या फेरीसाठी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित होईल.

दि.९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान उमेदवारांना दिलेल्या संदेशात नमुद संस्थेत दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व्यक्तीशः स्वतंत्ररीत्या हजेरी लावावी . त्याचदिवशी समुपदेशन फेरीसाठी दुपारी १ वाजता गुणवत्ता यादी प्रकाशित होईल आणि उपलब्ध जागेनुसार जागेचे वाटप होईल. याकरिता उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे आणि उमेदवारांनी समुपदेशन फेरीचा लाभ घ्यावा , असे प्राचार्य संतोष साळुंके यांनी कळविले आहे. तसेच काही शंका किंवा अडचण असल्यास प्रवेश प्रमुख श्री. मधूपवार किंवा श्री. नितिन श्रीगिरीवार यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे