बिलोली तालुक्यातील प्रशासन आपल्या गावी उपक्रमाची सुरुवात

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.4फेब्रुवारी):- तालुक्यातील नागरिकांची कामे विविध कार्यालयातील संबंधित असतात व ती करून घेण्यासाठी वेळ व पैसा वाया जाऊ नये यासाठी आणि नागरिकांची कामे याच बरोबर शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावरील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना एकत्रित घेऊन समस्या सोडविण्यासाठी शासन आपल्या गावी उपक्रमाची सुरुवात केली आहे.

बिलोली तालुक्यात एकूण सहा महसूल मंडळ असून प्रत्येक गावातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा महसूल मंडळावर जाऊन आपली अडचण मांडल्यास त्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी प्रत्येक आफिसला परिपत्रक पाठवून उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत परिपत्रकात तहसीलदार महसूल विभागाच्या समस्या एक ते अकरा सोडवाव्यात, पंचायत समिती,( ग्राम विकास विभाग) यांनी सहा समस्या,भूमी अभिलेख (मोजणी विभाग) यांनी दोन समस्या तालुका कृषी अधिकारी( कृषी विभाग) कृषी विभाग यांनी तेरा समस्या, तालुका आरोग्य अधिकारी (आरोग्य विभाग) चार,समस्या, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन विभाग सामाजिक वनीकरण) यांनी दोन समस्या, सोडवाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.

शासन आपल्या गावी उपक्रमांतर्गत ५ फेब्रुवारी रोजी सगरोळी,१२ फेब्रुवारी रोजी कुंडलवाडी २६ फेब्रुवारी रोजी आदमपूर ५मार्च रोजी लोहगाव १२ मार्च रोजी रामतिर्थ हा कार्यक्रम होणार आहे सर्व जनतेने आपल्या मंडळातील अडचणी त्या दिवशी संबंधित विभागाकडे मांडाव्यात असे आव्हान करण्यात आले आहेत

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED