महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

41

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.४फेब्रुवारी):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत २० टक्के बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. या पैकी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना पुर्णपणे ऑनलाईन असुन अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे अनिवार्य आहे.

इच्छुक लाभार्थींनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादीत) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातारा दुरध्वनी क्र. ०२१६२-२९५१८४ येथे संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांनी कळविले आहे