सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महीला अवार्ड 2021 सोहळा पंढरपूरात

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.5फेब्रुवारी):-संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या मनामनात रुजलेली सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली सरपंच संघटना महाराष्ट्रभर कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दि 8 मार्च 2021रोजी दुपारी 1वा पंढरपूर मध्ये महीलाचा सन्मान करण्यात येणार आहे.

संस्थापक बाबासाहेब पावसे संगमनेर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे हा सोहळ्यासाठी मराठावाडयातील समाजसेविका स विजयाताई सुधाकर काचावार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे या सोहळ्याच्या स्वागतध्यक्ष म्हणून सौ काचावार भुषवणार आहे.

यासाठी जिल्हाध्यक्ष नितीन काळे महीला अध्यक्षा सौ सुनंदा वाघमारे रविराज गाटे, राज्य संपर्क प्रमुख राजेंद्रकुमार बुध्याळ सर यांच्या सह वेळी महाराष्ट्रभरातून महीला उपस्थितीत रहाणार आहे यासाठी आपण आपली माहीती प्रस्थाव दि 25 फेब्रुवारी पर्यंत सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यालय पुणे नाशिक हायवे एन एच 50 हिवरगाव टोलपाझा संगमनेर या ठिकाणी पाठवावे संपर्क 9011960002 अशी माहिती सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED