सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्या मंजूर करा – ग्रंथमित्र भाऊ पत्रे

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.5फेब्रुवारी):-गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या मागण्या प्रलंबित असून त्याबाबतचे निवेदन शिष्टमंडळासह उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.उदय सामंत यांची गडचिरोली येथे भेट घेऊन नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे यांनी निवेदन दिले.

ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करणे , नवीन ग्रंथालयास परवानगी देणे , जुन्या ग्रंथालयाचे दर्जाबदल करणे , सन २०१२ पासून ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ नाही ती वाढ करणे, कर्मचाऱ्यांना आॕनलाईन दरमहा वेतन देणे , ग्रंथालयाच्या इमारत बांधकाम विशेष अनुदान देणे आदी विविध मागण्याचे निवेदन पत्रे यांनी ना. मंत्रीमहोदयांशी देऊन सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी ग्रंथालय संघ गडचिरोली जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य जगदीश म्हस्के,सचिव रविंद्र समर्थ आदी पदाधिकारी उपस्थित होते. याकडे विशेषतः लक्ष देण्यात येईल असे अभिवचन याप्रसंगी मंत्रीमहोदयांनी दिले.