राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर

27

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.6फेब्रुवारी):-राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध आंदोलनाद्वारे राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे व राज्यातील पत्रकारांच्या गळ्यातील ताईत ठरलेले पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचा झंझावात राज्यभर पोहोचला आहे. पत्रकारांच्या समस्या स्थानिक पातळीवर जाऊन समजून घेण्यासाठी संतोष निकम दिनांक 7 फेब्रुवारी पासून आपल्या शिष्टमंडळासह विदर्भ व मराठवाडा दौर्‍यावर येत आहे. राज्यातील नव्हे तर देशभरातील पत्रकारांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेणारे पाहिले राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या रूपाने देशाला लाभले आहे. संतोष निकम यांच्या स्वागतासाठी विदर्भ व मराठवाडा राज्यात जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर इंगळे यांनी दिली.

राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या स्वागतासाठी मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कैलास साळवे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर इंगळे, कार्याध्यक्ष एस. पी. हिवाळे, विदर्भ प्रदेश महासचिव उल्हास शेगोकार, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश दांडगे, वासीम जिल्हाध्यक्ष अर्जुन डोंगरदिवे, बीड जिल्हाध्यक्ष शीतलकुमार जाधव, यवतमाळ जिल्हाध्यक्ष पद्माकर घायवान, नांदेड जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, जालना जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाघमोडे आदींसह राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी प्रयत्न करत आहे.