शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे गंगाखेड येथील कापुस पणन महासंघाचे खरेदी बंद

30

🔹शिल्लक शेतकऱ्यांनी परभणी पणन महासंघ कापूस विक्री घेऊन जावे

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.7फेब्रुवारी):-शासनाच्यावतीने हमी भावात कापूस खरेदी करण्यासाठी गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चार जिनिंग वर ऑनलाईन पद्धतीने कापूस खरेदी करण्यात येत होता, त्यामध्ये फक्त निम्या शेतकऱ्यांनी पणन महासंघ कापूस खरेदी करण्यासाठी आणल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने वेळोवेळी वर्तमानपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कळविण्यात आले. त्यांना एसएमएस ही पाठवण्यात आला होता. पण खासगी जिनिंग मालक यांच्यामार्फत चढ्या भावाने कापूस खरेदी होत, असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली.

मागील आठवड्यामध्ये फक्त 31 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला त्यात फक्त 1030 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या कारणाने दिनांक 8 फेब्रुवारी पासून पणन महासंघ कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड अंतर्गत कापूस खरेदी आता बंद करण्यात येत आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक तायडे व सचिव राजेभाऊ गायकवाड यांनी दिले आहेत दिनांक 08 फेब्रुवारी पासून शिल्लक असलेल्या कापूस शेतकऱ्यांनी परभणी पणन महासंघाच्या केंद्रत कापूस विक्रीसाठी घेऊन जावे असे लेखी पत्राद्वारे कळवले आहे.