गॅस दरवाढ: गोवऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

25

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.7फेब्रुवारी):- डिझेल-पेट्रोल पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले आहेत या दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रभर यामध्ये महिला आंदोलन करत आहेत. बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्या आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणाच्या गोवऱ्या घेऊन पोहोचल्या. गॅसची झालेली दरवाढ यामुळे महिला त्रस्त झालेले आहेत. घर खर्चाचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे पुन्हा आम्हाला पारंपरिक पद्धतीने चूल पेटविली लागेल. याची आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचा आंदोलन महिलांनी म्हटले आहे.

यावेळी या आंदोलक महिलांनी जोरदार घोषणा दिल्यात. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आज ओरड होत असताना महिला देखील त्याच दरवाढीमुळे हैराण झालेल्या आहेत. उज्वला गॅस योजनेमधून अनेक ठिकाणी खास दिलेला आहे. मात्र, त्याच्या किमती वाढल्यामुळे ते घेणे परवडत नसल्याचे महिलांनी सांगितलं त्यामुळे घराघरात जरी असला तरी तो भरणे परवडत नसल्यामुळे आता गॅस न वापरता पारंपरिक पद्धतीने चूल पेटवण्याची वेळ महिलावर ओढावली असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.