प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत धावणा-या सैनिकांचे स्वागत

24

🔹भारतीय नौदलातील दोन सैनिकांचा निरोगी व सुदृढ भारत घडविण्यासाठी ५६ दिवसांचा धावता प्रवास

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.7फेब्रुवारी):- दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वा. मुंबई- गुजरात महामार्गावर दोन तरुण धावतांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बोरीवली तालुका युवा महिलाध्यक्षा मेघा मोरे व खालापूर तालुका युवा महिलाध्यक्षा श्रृतिका कदम यांनी पाहिले व तात्काळ त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ते दोन तरुण भारतीय नौदलाचे सैनिक असून ६० दिवसांच्या सुट्टीवर आले आहेत.

त्यातील संजय कुमार हरियाणाचे तर राम रतन हे राजस्थानचे रहिवासी असून त्या दोन युवकांनी त्यांच्या धावण्यामागचे कारण सांगितले. हा धावता प्रवास करण्यामागचा त्यांचा उद्देश भारताला सुदृढ व निरोगी बनवणे हा असून राज्या राज्यांतून सदृढ आरोग्यासाठी लोकांना त्यांच्यासोबत धावण्याचे आवाहन करीत आहेत. प्रत्येक राज्यातील नागरिक त्यांचे स्वागत करुन त्यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आहेत.

संजय कुमार व राम रतन यांचा हा प्रवास कन्याकुमारी ते कश्मीर (के २ के) ४४३१ कि.मी.असा असून त्यांनी दि. १२ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी सुरु केला व ५६ दिवसांनी म्हणजेच दि.१८ मार्च २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय महीला दिनाच्या दिवशी त्यांचा प्रवास कश्मीर येथे पूर्ण होणार आहे. या प्रवासात एकूण ११ राज्ये, ९१ शहरे आणि १००० गावांमध्ये ते निरोगी व सुदृढ़ भारताचा संदेश पोहचविणार आहेत.

याअगोदर अल्ट्रा रनर सोफिया खान हिने एकता, शांती व समानतेचा संदेश देण्यासाठी ४०३५ कि.मी.चा प्रवास ८७ दिवसांत पूर्ण करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले आहे.संजय कुमार व राम रतन या दोन्ही सैनिकांना सत्य पोलीस टाईम्सच्या पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बोरीवली तालुका युवा महिलाध्यक्षा मेघा मोरे, आणि खालापूर तालुका युवा महिलाध्यक्षा श्रुतिका कदम यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.