गॅसशेगडी तसेच सिलेंडर चोरणारा पोलिसांचे ताब्यात

28

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रातिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.7फेब्रुवारी):-दिनांक 5 चे रात्री दरम्यान घराचे दाराला कडी लावुन भावाच्या लग्नाचे हळदीचे कार्यक्रमात गेला असता एका अज्ञात चोरट्याने घराची कडी उघडुन घराचे आत प्रवेश करीत घरात ठेवलेली गॅसशेगडी तसेच सिलेंडर असा एकुण 4 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची हिंगणघाट पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी अपराध क्र. 125/2021 कलम 454,457,380 भादंविअन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

ठाणेदार श्रि. संपत चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा विवेक बनसोड यांनी चमुसह परीसरात आरोपीचा शोध घेतला. यावेळी आरोपी नामे संजय मंगलसिंग वैद,(41) रा. स्विपर काॅलनी, हिंगणघाट यास ताब्यात घेवुन चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल जप्त केला.सदरची कार्यवाही दिनेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, शसंपत चव्हाण ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार विवेक बनसोड, सुहास चांदोरे, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे यांनी केली.