खानगांव येथे नागदिवाळी महोत्सव सोहळा संपन्न

    90

    ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.7फेब्रुवारी):- माना आदीम जमात मंडळ ग्राम शाखा खानगांव यांच्या वतीने दोन दिवसीय नागदीवाळी महोत्सव साजरा करण्यात आला.पहिल्या दिवशी सर्व माना जमाती मधिल बांधवांनी आपल्या रुढी परंपरे नुकसान खणाचा (मठपुजा) कार्यक्रम आयोजित करुन संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने गावामधुन दिपज्योती रॅली काढण्यात आली.दुसऱ्या दिवशी माना जमातीचे प्रेरणा स्थान राजमाता माॅं माणीका यांच्या प्रतिमेचे व महामानवांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. आणि मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला व खानगांव येथील नवनिर्वाचित सदस्य यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

    मार्गदर्शनात्मक कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुधाकरची चौखे सर वरोरा तर प्रमुख पाहुणे म्हणून देवराजी कारमेंगे चंद्रपूर, वामन भोंगळे , बाबाराजी ठावरी, डॉ.गायकवाड मॅडम चंद्रपूर, नवनिर्वाचित सरपंच्या अर्चना राजेंद्र रामटेके, तंटामुक्ती अध्यक्ष तथा माना आदीम जमात मंडळ ग्राम शाखा अध्यक्ष रवि भाऊ चौखे ,नवनिर्वाचित सदस्य प्रमोदजी पाटील, मोरेश्वर निखाडे, किशोर हनवते, हिराबाई दडमल,अरुनाताई राजनहिरे, मंदाताई शेनमारे, आणि बहुसंख्य समाज बांधव व गावकरी कार्यक्रमाला उपस्थित होते , कार्यक्रमा चे संचालन अनिल दडमल व आभार प्रदर्शन विश्वास गराटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्व माना जमात व ग्रामवासी यांनी मोलाचे सहकार्य केले व महाप्रसाद देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.