सोलापूर जिल्ह्यात या तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडी रखडणार ?

33

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.8फेब्रुवारी):-माळशिरस तालुक्यातील सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी रखडणार का ? असा सवाल माळशिरस तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे.सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मळोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल झालेली आहे. उच्च न्यायालय मुंबई यांच्या खंडपीठाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या याचिकाकर्त्याची व हितसंबंधाची याचिका वरील सुनावणी मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे घेण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल झालेल्या तालुक्यांमधील दिनांक 8 ते 11 फेब्रुवारी 2021 रोजी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडी दिनांक 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत रोखून ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील मळोली गावच्या सरपंच पदाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात असल्याने माळशिरस तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडीविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे अद्याप पर्यंत सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा कोणताही आदेश आलेला नसल्याने इतर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे माळशिरस तालुक्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे