न्याहळोद येथील आदिवासी विकास संघ (असो) महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदिवासी टोकरे कोळी वधू वर सूचक मेळावा संपन्न

34

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.8फेब्रुवारी):-दि.७/२/२०२१ रोजी आदिवासी टोकरे कोळी बहूसंख्य असलेल्या धुळे तालूक्यातील न्याहळोद गावात आदिवासी विकास संघाच्या वतीने आदीवासी टोकरे कोळी समाजाचा समाज व वधूवर मेळावा पार पडला.यामध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या सर्व समाजातील मान्यवरांचा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी आ.वि.संघाचे अध्यक्ष श्री मोतीलाल सोनवणे सर व माजी उप जिल्हाधिकारी,श्री. भागवत सैंदाणे, धुळे जिल्हा अध्यक्ष श्री. संजय दावळे,श्री. ऑड . गणेश सोनवणे आणि श्री. नामदेव आप्पा साळवे, संदीप तवर,भैय्या साहेब सावळे, श्री.अरुण कोळी, सौ. कविता ताई कोळी, सौ. वैशाली ताई सैंदाणे , सौ गीतांजली ताई कोळी, कार्यक्रमात अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल सर्व समाज बांधवांना व भगिनींना रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर नेते, अधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव व इच्छुक वधूवर व पालक उपस्थित होते..